L. N. G. - I. U. S

डॉक्टरीण बाई काहीही झाल तरी मला पिशवी नाही काढायची . मोठ्या आशेन आलो आम्ही तुम्हापाशी. आमच्या शेजारच्या बाई ले तुम्ही कायची म्हणे तर मशीन बसवून देल्ली तवा पासून तिले कामाची काय तरतरी आली काय सांगू , नाय तर दर महिन्याले तिले २०-२० दिवस पाळी जाये. आन मंग ते एकदम काची पडून जाये . मलेपण तेच मशीन बसावाची हाये. पण गर्भपिशवी काढाची नाये.

मशीन म्हणजे 'LNG IUS' हे माझ्या आता लक्षात आल होत . खर म्हणजे या हार्मोनल device चा शोध मुख्यतः झाला होता तो गर्भनिरोधक कारणासाठी, पण हळूहळू त्याचा वापर होत असताना लक्षात आल हे साधन इतरही रोगांना उपयोगी पडू शकते . जसे खूप जास्त मासिक पाळी जाणे , छोट्या मोठ्या गर्भपिशवीच्या गाठी ; गर्भापिशविला मासवा असणे इत्यादी.

सुरुवातीला हे LNG IUS ७ वर्षाच्या कालावधीचे मिळायचे पण आता ३ आणि ५ वर्षासाठी सुध्दा मिळते .

गर्भनिरोधक वापरासाठी अतिउत्तम कारण

Failure rate फ़क़्त ०.२ % , आणि स्तनपान करणारी माता देखील याला वापरू शकते. जेव्हा दुसरे बाळ हवे तेव्हा काढता येते , पण जर तुम्हाला इतर कारणासाठी वापरायचे झाल्यास प्रथम एक DAC म्हणजे धुलाई करून कॅन्सर किंवा कॅन्सरपूर्वीची अवस्था तर नाही हे pathology करून सिद्ध झाल्यावरच बसवायला पाहिजे .

बसवल्यावर काही त्रास होतो का ?

थोडेफार side effect असू शकतात , जस पाळीच्या अनियमितता , कधीकधी क्वचित अंडाशयात छोट्या गाठी , थोडेफार ओटीपोटीत दुखणे इत्यादी. पण एकदा जर भावली , तर त्यासारखे दुसरे साधन नव्हे.

हल्ली याला हिस्त्रेतामी ( गर्भपिशवी काढण्याचे operation) चे Medical Operation देखील म्हणतात .

आता गमतीचा भाग म्हणजे , जर मी गायनिक पेशंटला (जास्त रत्क्तस्त्राव, गाठी ) (जिथे बरेचदा फमिली प्लान्निंग चे operation झालेले असते ) म्हटले की तुला कॉप्पेर टी (copper -t) बसवते , तर ती convince होत नाही , पण रत्कास्त्रव थांबवण्यासाठी मशीन यंत्र बसवते असा सल्ला दिला की आनदाने बसवतात आणि मग बरेचदा operation टळतात अथवा 2-४ वर्षे निघून जातात .

कोणी बसवू नये ?

जर तुम्हाला गर्भधारणा असेल किंवा गर्भपिशवीचा कर्करोग (Uterine Cancer ) , गर्भपिशवीच्या तोंडाच्या कर्करोग (Cervicle Cancer), स्तनाचा कर्करोग (Breast Cancer) , गर्भापिशविला किंवा योनीमार्गाचे संक्रमक आजार (P.I.D. | STD) , लिव्हरचा आजार यांनी बसवू नये .