Uterine Malformations

सकाळी छान साखर झोपेत असताना मोबाइल वाजला, जरासा त्रासिक चेहरा करूनच मी कॉल घेतला, unknown number होता. " मैडम, मै बालाघाट से xxxxx बोल रहा हु, पहचाना ?"

आठवत काहीच नव्हते, मनात म्हंटले, संभाषण सुरु झाल्यावर ओळखता येईल. अस स्वताला म्हणून मी म्हणाले, हा बोलिये भाई साहब , आजकी appointment चाहिये होगी तो reception पे कॉल किजीये,

नही मैडमजी आपही से बात करनी है , प्रतिउत्तर !

अच्छा बोलिये !

मैडमजी मेरी मिसेस प्रेग्नंट थी तब हम पहले महिने आये थे , तब आपने सोनोग्राफी की थी . 'तो क्या हुआ ' आता माझी उत्सुकता वाढली .

' नही तब आपने बोला था दिल के आकार जैसी बच्चादानी जैसा दिख रहा है , और एसेमे abortion के चान्सेस होते है !'

'फिर .......' आता मला अतिशय घाई झाली होती.

'नही मेरी मिसेस की डीलीवेरी हो गई , बच्चा पैर से था , सीझर हुआ !'

आता माझा जीव भांड्यात पडला, suddenly I felt happy & congratulated him. Then मी त्याला विचारले , ये बताने के लिये आपने कॉल किया क्या? Very rarely a patient who visited once or twice calls us back !

जी नही , मैडमजी | मैने कॉल इसलिये किया की आपने जो सोनोग्राफी की वो सबसे सही थी , बादमे ४ बार सोनोग्राफी करवाई, सबने बोला एक हि बच्चादानी है पर जिनके यहा सीझर करवाया वो डॉ . मैडम बोली आपकी सबसे पहलेवाली सोनोग्राफी एकदम सही थी |

बच्चे का वजन कितना है ?

2.५ kg

मैडमजी अगला बच्चा रह्नेपर हम फिरसे आपही के पास पहला checkup करवाने आयेंगे .

वो तो बादकी बात है , बीचमे आप जब नागपूर आओ आकर मिलीये .

'और कुछ पूछना है ', Before disconnecting the call I asked.

जी हा मैडम ! हमे यहापर डॉ. ने सलाह दि की दोनो बच्चादानी को एक करने का operation करवा ले इससे फिर abortion की नौबत नही आयेगी | आप क्या कहती है ?

मी : , भाई साहब अभी बच्चा तो हो गया और बच्चादानी ने भी अपने आपको prove कर दिया , की जितनी जगह है उतनी बच्चे के लिये sufficient है पुरे ९ महिने मे बच्चा हुआ , वजन भी अच्छा है तो अभी operation का कोई सवाल हि नही |

बाद की बात बाद मे देखेंगे .

Extremely satisfied with my answer, he happily kept the phone.

तर मित्रानों आज मी तुम्हाला गर्भपिशाविचे जन्मतः येणारे व्यंग्य (uterine malformations) बद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. सर्वसाधारणपणे आईच्या पोटात असताना पहिले ३ महिन्यात बाळाच्या सर्व अंगाची निर्मिती होते . त्या प्रोसेस ला Embryogenesis अस म्हणतात या Embryogenesis प्रकारात जेव्हा Mullerian Duct जेव्हा व्यवस्थितपणे जुळत नाहीत तेव्हा uterine malformations होतात .

मग हे व्यंग्य वेगवेगळ्या पद्धतीचे असतात जसे एखाद्या बाईला गर्भपिशवीच नसणे , कधी केळाच्या आकाराची पिशवी , कधी दोन गर्भापिशव्या असणे , कधी हृदयाच्या आकाराची गर्भपिशवी असणे , कधी कधी आडपडदा असतो , तर कधी T shape चे uterus असणे .

या गर्भपिशवीच्या व्यंगासोबत किडनी चे हि व्यंग्य सोबत राहू शकतात कारण, दोन्ही uterus आणि किडनी सोबत निर्मिती होत असते .

बर ओळखायचे कसे ?

जर मुलीला वयात आल्यावर पाळी नाही आली तर काळजीपोटी पालक डॉक्टरांकडे नेतात आणि वयाच्या १५ - १८ पर्यंत निदान होते , लग्नझाल्यावर सतत गर्भपात होत राहिला , अपुऱ्या दिवसाची प्रसूती झाली , व्यंधत्व असणे , संबंध करताना त्रास होणे, पाळीच्या वेळेस ओटीपोटात दुखणे , हि याची काही लक्षणे .

सोनोग्राफी द्वारे रोगनिदान सहजगत्या करता येते, गरज पडल्यास MRI Pelvis देखील करता येतो. याचे प्रमाण जवळपास ६.७% आहे .

उपाय ?

जर गर्भपिशवीच नसेल , तर गुणसूत्रांची चाचणी करून पेशंट मुलगा आहे की मुलगी आहे हे बघावे लागते, त्याप्रमाणे त्यांचे मार्गदर्शन करावे लागते

केळासारखी गर्भपिशवी आढळल्यास , दुसरी छोटी गर्भपिशवी त्याच्या दुसऱ्या बाजूला आहे का हे पाहण्यात येते, असल्यास तो जुळली आहे अथवा वेगळी आहे हे पाहण्यात येते.

या प्रकाराला surgery लागत नाही पण जर rudimentary horn पासून कुठला त्रास असेल तर त्याला सर्जरीद्वारे काढावे लागते . कधी कधी त्यात endometriosis नावाचा आजार होऊ शकतो, कधीकधी त्यात गर्भधारणा पण होऊ शकते , या पेशंटना गर्भपात होऊ नये म्हणून गर्भपिशवीच्या तोंडाला टाका लावावा लागू शकतो .

आता जर दोन गर्भापिशव्या असल्या ( ut. didelphys ) याला इतर काही उपचार नसतो , फ़क़्त गर्भधारणा झाल्यावर लवकर डीलीवेरी आणि रक्तस्त्राव होण्याची भीती असते.

हृदयाच्या आकाराच्या गर्भपिशवी ( Bicornuate Uterus ) असल्यास गर्भपाताचा धोका , लवकर प्रसूती, आडव किंवा पायाळू बाळ होणे , कधीकधी व्यंगात्मक बाळ होण्याचा धोका अतिशय जास्त असतो,

आडपडदा असल्यास याला कापून मोठी जागा करता येते.

आता Science प्रगत झाले आहे . टेस्ट टूब बेबी च्या आविष्काराने प्रत्येक जोडप्याला पालक बनण्याचा आनंद मिळू शकतो.

जसे गर्भपिशवी नसली तरी पेशंटच्या गुणसूत्रांची ( Chromosomal Analysis ) पाहणी करता येते . अशा पेशंटच्या अंडाशय आणि डीम्ब्वाहिनी चांगल्या असतात आणि त्यांना दुसऱ्या स्त्रीच्या गर्भापिशावीचा उपयोग करून आई बनण्याचे सुख मिळू शकते (Surrogacy).

अपुऱ्या दिवसाच्या अभ्रकाला हि मोठे करण्याच्या अद्यायवत सोयी उपलब्ध झालेल्या आहेत.

सर्जिकल पध्दती देखील खूप advance झालेल्या आहेत. युटेरस प्रत्यारोपण हि भारतात यशस्वी झाले आहेत.

प्रत्येक पेशंट वेगळा असतो. हाताळण्याची पद्धत वेगळी असते. धैर्य ठेवाव लागत.